राज्यात कोरोनाने डोके वर केले असुन रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच गुरुवारी मुंबईत रुग्णांची संख्या 20 हाजाराहुन जास्त वाढल्यामुळे प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी माहिती दिली आहे की आज मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील उपस्थित राहणार आहेत. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे मुंबईतील निर्बंधाबाबत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे निर्णय जाहीर करण्याची शक्याता आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

Tweet

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)