5जी मध्ये समाविष्ट करण्याच्या बहाण्याने फसवणूक होण्याचा धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. त्यांनी नागरिकांना याबाबत अलर्ट केले आहे. तुमची खाजगी माहिती अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. एखाद्या फोन कंपनी मधून बोलत असल्याचं भासवून काही माहितीवर, बॅंकेच्या तपशीलावर डल्ला मारला जाऊ शकतो. त्यामुळे थेट फोन वर किंवा कोणत्याही लिंक वर माहिती शेअर न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पहा ट्वीट
खबरदार!
नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधासोबतच फसवणुकीच्या नवनवीन पद्धतीही उदयास येत आहेत आणि त्यातीलच एक आहे आपल्याला ५G मध्ये सामील करून घेण्यासाठी येणारे फोन. आपली वैयक्तिक अथवा बँकसंबंधी माहिती कोणत्याही अनोळखी लिंकवर सामायिक करा नका.#Scam2022 #5GScam #CyberSafe pic.twitter.com/T0c1CmrpGC
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) October 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)