नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने शिवसेनेचे ट्विटर हँडल (Shivsena Twitter Handel) चे नाव बदलले असून शिवसेनेची वेबसाईट (Shivsena Website) हटवली आहे. ट्विटर हँडल आणि वेबसाईट हे दोन्ही शिवसेनेच्या नावावर होते, ते उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाकडून सांभाळली जात होती. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयानंतर उद्धव ठाकरेंच्या गटाने हे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटालाच खरी शिवसेना मानली आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी संध्याकाळी शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Shivsena Symbol) वापरण्याची परवानगी दिली.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)