
Gang-Rape Case In Titwala: ठाण्यातून सामूहिक बलात्काराची (Gang Rape) बातमी समोर येत आहे. टिटवाळा (Titwala) येथे एका 21 वर्षीय महिलेवर पाच पुरूषांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी बुधवारी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, या गुन्ह्यात आणखी दोन महिलांचाही सहभाग आहे, या महिला आरोपींना मदत करत होत्या. पीडित महिलेला तिच्या दोन महिला मैत्रिणींसह पुरूषांनी ड्रग्ज दिले. टिटवाळा पोलिसांनी (Titwala Police) सातही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला कल्याणमधील एका बांधकाम कंपनीत काम करते. पूर्वी ती टिटवाळा येथील तिच्या मावशीच्या घरी राहत होती. वादानंतर तिने जवळच राहणाऱ्या एका महिला मैत्रिणीकडे राहण्याचा निर्णय घेतला. दहा दिवसांनंतर, पीडितेने तिच्या मावशीच्या घरी परतण्याचा विचार केला. तिच्या एका मैत्रिणीने तिचे सामान वाहून नेण्यासाठी एका पुरुष मित्राला बोलावले. मदत करण्यासाठी पुरुष मित्र इतर चार मित्रांसह पोहोचला. ते सर्वजण कारने तिच्या मावशीच्या घरी निघाले. (हेही वाचा - Bandra Gang Rape Case: वांद्रे मध्ये 18 वर्षीय मुलीला गुंगीचं औषध देऊन सामुहिक बलात्कार; एक आरोपी फरार दुसरा अटकेत)
पीडितेने तिच्या जबाबात नमूद केले आहे की, त्या पुरूषांनी तिच्या मावशीच्या घरी जाण्यासाठी वेगळा मार्ग निवडला. तिने त्यांना मार्ग बदलण्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, ते प्रथम बांधकामाच्या ठिकाणी जातील आणि नंतर तिला तिच्या मावशीच्या घरी सोडतील. यानंतर त्या पुरुषांनी तिला मावशीच्या घरी न नेता अज्ञात ठिकाणी नेले. तिला अंमली पदार्थांचे इंजेक्शन देण्यात आले आणि त्यानंतर ती बेशुद्ध पडली. नंतर कल्याणमधील एका विश्रामगृहात ती पुन्हा शुद्धीवर आली. तेव्हा तिला अस्वस्थ वाटले. ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या अंगावर कपडेही नव्हते, असं एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. (नक्की वाचा: Mumbai Shocker: मैत्रीणीचा मॉर्फ व्हिडिओ सोशल मीडियावर केले व्हायरल, बारावीच्या २ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल .)
अधिकाऱ्याने पुढे म्हटले आहे की, ती बेशुद्ध असताना पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा तिला संशय आहे. चार दिवसांनंतर, आरोपींपैकी एकाने तिला ही घटना कोणालाही सांगू नये, अशी धमकी दिली आणि जर तिने तसे केले तर तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडित महिलेने घडलेल्या सर्व प्रकाराची तिच्या मावशीला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या दोन महिला मैत्रिणी आणि पाच पुरूषांविरुद्ध टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून टिटवाळा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.