Titwala Rape Case: टिटवाळा रेल्वे स्थानकात महिलेवर बलात्कार; आरोपी अटकेत
सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ती शहाड वरून ती लोकलने टिटवाळा स्थानकामध्ये आली. रूळावरून चालत असताना एकाने तिचा पाठलाग केला. नंतर तिला रूळांवर असलेल्या झाडाझुडपात नेले तिथेच तिच्यावर अतिप्रसंग झाला.
टिटवाळा रेल्वे स्थानकात (Titwala Police Station) एका महिलेवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार सोमवार रात्रीचा आहे. पोलिसांना या बलात्कार प्रकरणी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. सध्या या बलात्कार प्रकरणातील पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोमवार 13 नोव्हेंबर दिवशी रात्री उशिरा महिला ट्रेनमधून उतरली. घरी हात असताना एका व्यक्तीने तिला एकटं साधून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणामध्ये कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Titwala Crime: पतीची हत्याकरून पत्नीने रचला आत्महत्येचा बनाव, टिटवाळ्यात खळबळ .
पीडीत महिला शहाड मध्ये एका खाजगी कंपनीमध्ये काम करते. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ती शहाड वरून ती लोकलने टिटवाळा स्थानकामध्ये आली. रूळावरून चालत असताना एकाने तिचा पाठलाग केला. नंतर तिला रूळांवर असलेल्या झाडाझुडपात नेले तिथेच तिच्यावर अतिप्रसंग झाला. याबाबत तोंड उघडलं तर जीव घेईल अशी धमकी आरोपीने पीडीतेला दिली होती. पण हा सारा प्रकार तिने पतीला सांगितला.
लोकसत्ताच्या वृत्तानुसार, पीडीतेचा पती शेजार्यांना घेऊन घटनास्थळी पोहचला. तेव्हा आरोपी निशांत चव्हाणला अटक करण्यात आली. निशांत चव्हाण हा खाजगी कंपनीमध्ये काम करतो.
(The above story first appeared on LatestLY on Nov 14, 2023 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

