Shiv Sena (UBT) Lok Sabha Election 2024 Campaign Ad: उद्धव ठाकरे गटाच्या (UBT) जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर केला असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. आज चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रचार जाहिरातीमध्ये पॉर्न स्टार असलेल्या अभिनेत्याने भूमिका केल्याचा आरोप करून वादाला तोंड फोडले. यावेळी महिलांचा अवमान करण्याची एकही संधी ठाकरे गट सोडत नाही, अशी टीका वाघ यांनी केली.

चित्रा वाघ म्हणाल्या, 'अदूबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड'च्या 'उबाटा'च्या ज्या जाहिराती आहेत, त्यामधील पात्र हा एक पॉर्न स्टार आहे. ठाकरे गट महाराष्ट्रामध्ये पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहे. हा पॉर्न स्टार जाहिरातीमध्ये विचारतो की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार? आणि हाच व्यक्ती लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतोय. ही व्यक्ती ‘उल्लू’ ॲपवर मुलींसोबत घाणेरडे कृत्य करत आहे. अशा माणसाला घेऊन त्यांनी (ठाकरे गटाने) महिला अत्याचारावरची जाहिरात कशी केली? तसेच ही जाहिरात कंपनी आणि उद्धव ठाकरे यांचे काही संबंध आहेत का? याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे.' (हेही वाचाManoj Jarange On BJP: महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांमध्ये मराठा समाजाविषयी प्रचंड द्वेष - मनोज जरांगे)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)