शिवसेनेमध्ये जून 2022 मध्ये फूट पडल्यापासून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आक्रमक अंदाजात दिसले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली बाहेर पडलेल्या आमदारांना, खासदारांना 'गद्दार' म्हणत टीका करण्यापासून आगामी निवडणूकांसाठी रणनिती आखण्यात आणि राज्यात दौर्यांचा धडाका लावत शिंदे-फडणवीस सरकार वर टीकास्त्र डागण्यात आदित्य ठाकरे अग्रेसर दिसत आहेत. त्यांच्या याच नव्या अंदाजावर आता शिवसेनेकडून 'सेनेचा युवराज' हे नवं गाणं लॉन्च करण्यात आलं आहे. या गाण्याला मनिष राजगिरे आणि शमिका भिडे यांचा आवाज आहे. शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेचे संघटक संजय कदम यांनी हे गीत तयार केले आहे.
सेनेचा युवराज गाणं
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)