बीड मधील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे निघाले आहेत. आरोपींना बेड्या ठोकून शासन करण्याचं आव्हान असताना आज मुंबई मध्ये देशमुख कुटुंबाने 'सागर' बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सुरेश धस यांच्या मध्यस्थीने त्यांची भेट झाली आहे. यावेळी आरोपी कितीही मोठा असला तरीही त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याचं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख मीडीयाला प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत. देशमुख कुटुंबाच्या मागणीनुसार SIT मध्ये त्यांना हवे असलेले अधिकारी समाविष्ट करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले आहेत.

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने घेतली मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)