महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून ड्र्ग्स प्रकरणांचा छडा लावणारे आणि मुंबईत अनेक ड्रग्स कारखान्यांवर छापेमारी करणारे एनसीबी झोनल डिरेक्टर समीर वानखेडे सध्या संशयाच्या जाळ्यात आहेत. मंत्री नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंवर करण्यात आलेल्या आरोपांवर आता त्यांच्याकडून उत्तर आले आहे. समीर वानखेडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी सलमान नामक एक ड्र्ग्स तस्कर त्यांच्या बहिणीकडे आला होता. तिने NDPS प्रकरण घेणं नाकरल्याने त्याला अटक झाली आणि तो जेल मध्ये आहे. मागील काही महिन्यांमध्ये मध्यस्थींच्या मदतीने खोटी प्रकरणं रचून त्यामध्ये रोवण्याचा प्रयत्न होत असल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे यामध्ये ड्र्ग्स माफियांचा पाठिंबा असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. तसेच महागड्या कपड्यांचे आरोप देखील केवळ अफवा असल्यचं त्यांनी म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)