राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीनंतर पवार कुटुंबदेखील फुटले काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमची केली जाते. परंतू, या चर्चेला आमदार रोहित पवार आणि पार्थ पवार यांनी जोरदार उत्तर दिले. निमित्त ठरले हिंजीवडी महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन्ही बंदू आणि विद्यमान काळातील राजकीय विरोधक एकत्र आले. दोघांनीही उपस्थितांच्या गर्दीमध्ये महोत्सवाचा आनंद घेतला. यावेळी दोघांच्याही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला साद घातली. मात्र, हे दोन्ही नेते अगदी खेळीमेळीत परस्परांशी संवाद साधताना दिसले. (हेही वाचा, EVMs and VVPAT Cross-Verification: ईव्हीएमच्या कार्यपद्धतीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारले प्रश्न; समितीच्या अधिकाऱ्यांना बोलावले)

व्हिडिओ

रोहीत पवार आणि पार्थ पवार यांचा व्हिडिओ राजकीय कार्यकरर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जे आपल्या नेत्यांसाठी कुटुंबकलहात रमतात किंवा तंटाबखेडा निर्माण करतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)