Ratan Tata Funeral: देशातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे काल रात्री अकराच्या सुमारास निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आता आज संध्याकाळी वरळीच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले व अशाप्रकारे ते पंचत्वात विलीन झाले. यावेळी स्मशानभूमीत मोठी गर्दी उसळली होती. उद्योग जगतातील अनेक लोक, राजकीय लोक, अनेक सेलेब्ज तसेच टाटा कंपनीचे कर्मचारी रतन टाटा यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी वरळी स्मशानभूमीत पोहोचले होते. यावेळी 'रतन टाटा अमर रहे', अशा घोषणाही देण्यात आल्या.

रतन टाटा यांच्या निधनावर पीएम मोदींसह जगभरातील सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र आणि झारखंड सारख्या राज्यांमध्ये एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्यात आला. सकाळी 10 वाजल्यापासून रतन टाटा यांचे पार्थिव दर्शनासाठी एनसीपीए येथे ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी त्यांची अंत्ययात्रा सुरु झाली. आता आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (हेही वाचा: Ratan Tata यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची राज ठाकरे यांची PM Narendra Modi ना पत्र लिहित मागणी

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)