समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये स्पर्धकांना अश्लील प्रश्न विचारल्यानंतर रणवीर इलाहाबादियासह शोचे आयोजक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणावरून बराच गोंधळ उडाला आहे. अलाहाबादिया, रैना आणि इतर अनेकांविरुद्ध पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अशात मुंबई पोलिसही या प्रकरणाबाबत कारवाईत उतरले आहेत. आज मुंबई पोलिसांचे एक पथक युट्यूबर रणवीर इलाहाबादियाच्या घरी पोहोचले आहे. याबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. समय रैनाच्या या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील प्रश्न विचारला होता. त्यानंतर याबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी रणवीरवर टीका केली. आता हे प्रकरण आणखीनच चिघळले आहे.
पालकांच्या लैंगिक संबंधाशी संबंधित रणवीरच्या प्रश्नाबद्दल सामान्य जनतेपासून राजकारण्यांनी त्याच्यावर कडक टीका केली आहे. आता भारत सरकारने शोचा तो भाग युट्यूबवर ब्लॉक केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी एक्स वर लिहिले की, ‘रणवीर अलाहाबादियाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये अश्लील आणि विकृत टिप्पण्या होत्या, शोचा भाग सरकारच्या आदेशानंतर ब्लॉक करण्यात आला आहे.’ (हेही वाचा: Ranveer Allahbadia Controversy: रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीमध्ये वाढ; संसदेत उपस्थित होणार मुद्दा, All Indian Cine Workers Association ने केली India's Got Latent वर तात्काळ बंदी घालण्याची मागणी)
Ranveer Allahbadia Controversy:
A team of Mumbai Police has reached YouTuber Ranveer Allahabadia's residence, following the stir around his comments on a show. More details awaited: Mumbai Police
Yesterday, a complaint was filed against Ranveer Allahabadia, social media influencer Apoorva Makhija, comedian…
— ANI (@ANI) February 11, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)