प्रकाश आंबेडकरांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र ते या सोहळ्यासाठी अनुपस्थित राहणार आहेत. त्यांनी सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मला मिळाले. मी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, कारण हा कार्यक्रम भाजप-आरएसएसने मंजूर केला आहे आणि हा धार्मिक कार्यक्रम निवडणूक फायद्यासाठी राजकीय मोहीम बनला आहे.’

ते पुढे म्हणतात, ‘माझे आजोबा डॉ.बी.आर. आंबेडकरांनी इशारा दिला होता की, जर पक्षांनी देशापेक्षा धर्म वर ठेवला तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे गमावले जाईल. माझ्या आजोबांची भीती आज खरी झाली आहे. देशापेक्षा धर्म मोठा समजणाऱ्या भाजप-आरएसएसने आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे. जय फुले. जय सावित्री. जय शाहू. जय भीम.’ (हेही वाचा: Ram Temple Pran Pratishtha Ceremony: राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी; अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल, जाणून घ्या सविस्तर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)