Pune Rain Update: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत 26 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, तर पुण्यात 24 ते 29 सप्टेंबर या कालावधीत हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज दिला आहे. पुण्यात (Pune Weather) संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे, यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. ओढे आणि नाले ओसांडून वाहत आहे. या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. मुठा व पवना नदीपात्रात येव्या नुसार व मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी मुठा नदीपात्र व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी पवना नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये उतरू नये असे आवाहन केले आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट दिलेला असून पुढील 24 तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याबाबत हवामान विभागाचा अंदाज आहे. (हेही वाचा: Maharashtra Weather: राज्यात मुसळधार पावसाचा 'रेड' अलर्ट, मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा)
पुण्यात मुसळधार पाऊस-
#PuneRains #Wagholi pic.twitter.com/eDz2mzmDAJ
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) September 25, 2024
#पुणे जिल्ह्यासाठी आज #रेडअलर्ट दिलेला असून पुढील २४ तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीहोण्याबाबत हवामान विभागाचा अंदाज.#Punerain#Redalert pic.twitter.com/w16aHAVGqg
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) September 25, 2024
पंतप्रधान @narendramodi यांची गुरूवारी SP काॅलेज मैदानावर सभा होणार असताना पावसामुळे मांडवात चिखल झाला आहे. अजूनही पाऊस सुरू आहे, उद्याही आॅरेंज अलर्ट आहे. त्यामुळे पावसावर मात करून मोदींची सभा होणार का बघुयात
भाजप कार्यकर्ते सभा तर होणारच अस सांगत आहेत.#पुणे#PuneRains#pune pic.twitter.com/JeBYZMcaRJ
— Brijmohan Patil (@brizpatil) September 25, 2024
पुण्यात धो-धो ! मुसळधार पाऊस#latest #latestnews #updates #marathi #marathinews #maharashtra #pune #punecity #पुणे #पुणेकर #rain pic.twitter.com/GBqtfEnySR
— Policenama (@Policenama1) September 25, 2024
JM Road वर पाणी तुंबूनये यासाठी गेल्यावर्षी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले. आज जोरदार पाऊस पडला आणि पुन्हा पाणी तुंबले#pune#PuneRains#punenews pic.twitter.com/111JjJborE
— Brijmohan Patil (@brizpatil) September 25, 2024
पुणे आत्ता सूरू असेलला पाऊस… pic.twitter.com/PewVJQsO43
— Rahul Kulkarni (@RahulAsks) September 25, 2024
पाऊस आणि पाऊस
सगळीकडे पाऊसच पाऊस #पुणे #पाऊस #Punerain pic.twitter.com/ZU9IGBbady
— Chandrakant Ashok Khade (@Chandrakant2908) September 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)