स्वारगेट वाहतूक विभाग, पुणे, महाराष्ट्र अंतर्गत गंगाधाम मंदिर रस्त्यावर वाहतुकीचे उल्लंघन केल्याबद्दल दुचाकीस्वारांकडून लाच घेताना दोन वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांना चांगलेच महागात पडले आहे. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा लाच घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. कारण दोन्ही पोलीस लाच घेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. ही घटना 17 मेची आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस दुचाकीस्वाराकडून पैसे घेताना दिसत आहेत. मात्र त्यांनी त्याची पावती दिली नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे ट्रॅफिक डीसीपींनी दोन्ही वाहतूक पोलिसांचे निलंबन केले.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)