Pune Rain: महाराष्ट्रात पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना सुरू झाल्या आहेत. ताज्या माहितीनुसार, पुण्यात अशीच एक घटना घडली आहे. पुण्यातील पद्मावती नगरमध्ये (Padmavati Nagar ) सुरक्षा भिंत कोसळली. ज्यामुळे जवळच्या घरांचे नुकसान झाले आहे. राज्यात पूर्वमान्सून पाऊस सुरू झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. पुण्यातही गेल्या काही दिवसापासून पावसाने हजेरी लावाली. आज सकाळी पद्मावती नगरमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे एक भिंत कोसळली(wall collapsed). सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुरक्षिततेसाठी अधिकाऱ्यांनी परिसर रिकामा करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
भिंत कोसळली; आजुबाजूच्या घरांचे नुकसान
Pune, Maharashtra: In Padmavati Nagar, a boundary wall collapsed due to continuous heavy rain, damaging nearby houses. No casualties were reported. Authorities have issued evacuation notices for safety. pic.twitter.com/EC6gB447WU
— IANS (@ians_india) May 22, 2025
विदर्भ,मराठवाडा, कोकणासह उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. विदर्भ-मराठवाड्यात वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. Mumbai Rains Lead to Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर अचानक आलेल्या पावसामुळे दृश्यमानता मंदावल्याने डिव्हायडर वर चढली कार (Watch Video)
महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाचं जोरदार धुमशान सुरू आहे. अचानक येणार्या वादळी वारा, पाऊस आणि सोबतच वीजांचा कडकडाट मुळे मे महिन्यातच पावसांच्या दिवसांचा अनुभव मिळत आहे. यामध्येच आता सायक्लॉन शक्ती मुळे सध्या अरबी समुद्रामध्ये ECMWF मॉडेल च्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा समुद्र किनारी भागाजवळ राहणार आहे. त्यामुळे विकेंडला किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. 23 आणि 24 मे दिवशी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याकडून 23-24 मे साठी रायगडला रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे ऑरेंज अलर्ट वर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आयएमडी मुंबईच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, "उत्तर कर्नाटक-गोवा किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावर चक्राकार वाऱ्याचे प्रमाण कायम आहे. त्याच्या प्रभावाखाली 12 तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि पुढील 36 तासांत ते कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होऊ शकते."
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)