Mumbai Shocker: मुंबई लोकल ट्रेनमध्ये ( Mumbai Local Train) एका पुरूषाने एका महिला प्रवाशाला मारहाण केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 16 मे रोजी मुंबई रेल्वे नेटवर्कवरील कांजूरमार्ग आणि कल्याण स्थानकांदरम्यान घडली. त्या पुरूषाने महिलेवर हल्ला केला आणि ट्रेनमधून उतरल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर महिलेने प्रथम पोलिसांशी संपर्क साधला आणि जवळच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुंबई रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "महिलेने गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तपासात जवळपासच्या स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू आहे." पोलिसांनी या प्रकरणात जलद कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
वादादरम्यान महिलेला बेदम मारहाण
A man assaulted a woman passenger after an argument between the two on a local train in Mumbai.
According to reports, a police case was filed, and the accused was yet to be traced.
The incident happened on a train running between Kanjurmarg and Kalyan stations in Mumbai on… pic.twitter.com/ivndLd6Hva
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) May 21, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)