Pune Marathi Signboard: मुंबईमध्ये (Mumbai) दुकानांनी देवनागरी लिपीत मराठी साईनबोर्ड (Marathi Signboard) लावण्याच्या नियमाचे पालन केले आहे की नाही हे तपासण्यासाठी, बीएमसी अधिकाऱ्यांच्या पथकांनी तपासणी सुरु केली. मंगळवारी शहरभर 3,269 दुकानांची तपासणी करण्यात आली व त्यापैकी 179 दुकांनी या नियमाचे पालन न केल्याचे आढळून आले. आता पुण्यातही (Pune) दुकानांवरील मराठी बोर्डाबाबत मनसे आक्रमक झाली आहे. दुकानांवर मराठी नाव नसल्याने पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. पुण्यातील जंगली महाराज रोडवर मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी इंग्रजी भाषेत असलेल्या दुकानांच्या पाट्यांची तोडफोड देखील करण्यात आली. आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी दुकानांवर पेव्हर ब्लॉक फेकले. या प्रकरणी आता मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. (हेही वाचा: Pune Accident: दाट धुक्याचा अंदाज न आल्याने भरधाव क्रुझरची टेम्पोला धडक लागल्याने भीषण अपघात, तीघांचा दुर्दैवी मृत्यू)

पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचे मराठी साईनबोर्ड्ससाठी आंदोलन-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)