Pune Metro Update: पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पुणे मेट्रोने बुधवारी आपल्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट शेअर केले. शुक्रवारी (2 नोव्हेंबर) लक्ष्मीपूजनामुळे दोन्ही मार्गावरील (पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी) मेट्रो सेवा संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. शनिवारपासून, मेट्रो सेवा सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत पुन्हा सुरू होईल. याआधी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि भारतीय जनता युवा मोर्चा (बीजेवायएम) महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कुणाल टिळक यांनी पुणे मेट्रोला रात्री 11 वाजेपर्यंत वेळ वाढवण्याची विनंती केली होती. मात्र पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रशासन आणि जनसंपर्क) हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, मेट्रो सेवेच्या वेळेत लवकरच वाढ होण्याची शक्यता नाही. या क्षणी वेळ वाढवणे कठीण आहे. आम्हाला रात्री गाड्या आणि इतर पायाभूत सुविधांची प्रतिबंधात्मक देखभाल करावी लागते. (हेही वाचा: Reliance Jio Diwali Gift Box: मुकेश अंबानींनी दिवाळीत रिलायन्स जिओच्या कर्मचाऱ्यांना दिली 'ही' भेट; अनबॉक्सिंगचा व्हिडिओ व्हायरल)
Pune Metro Update:
कृपया लक्ष द्या !!
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना
शुक्रवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. सायंकाळी ६:०० ते रात्री १०:०० दरम्यान मेट्रोची सेवा बंद… pic.twitter.com/vHHQVWzQbV
— Pune Metro Rail (@metrorailpune) October 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)