Reliance Jio Diwali Gift Box: सध्या दिवाळीचा आठवडा सुरू आहे. अशा परिस्थितीत जवळजवळ सर्व कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या भेटवस्तू देत आहेत. अशात अनेकांना मुकेश अंबानींच्या कंपनीच्या गिफ्टबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मुकेश अंबानी नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांना काही ना काही अनोखे भेटवस्तू देत असतात, त्यामुळे त्यांच्या भेटवस्तूंची नेहमीच चर्चा होते. दिवाळीच्या या आठवड्यात मुकेश अंबानी यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना एक भेट दिली आहे. या गिफ्टचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एका कर्मचाऱ्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. दिवाळीच्या या सणानिमित्त मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट बॉक्स दिला आहे, ज्यामध्ये काजू, बदाम आणि मनुका यांचा समावेश आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अंबानी कुटुंब आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी ओळखले जाते. नुकतेच मोठ्या थाटामाटात अनंत अंबानीच्या लग्नाचा सोहळा पार पडला. अशात दिवाळीच्या सणानिमित्त मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना सुकामेवा गिफ्ट म्हणून दिला आहे. (हेही वाचा: Deepawali & Vastu Tips: कोणत्या दिशेला लक्ष्मी-गणेशाची स्थापना करून पूजा केल्याने होणार लाभ, जाणून घ्या, संपूर्ण माहिती)
Reliance Jio Diwali Gift Box:
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)