पुण्यातील पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. पिंपरी ते निगडी मेट्रोमार्गाचं काम लवकरच सुरु होईल आणि या मार्गावरुन मेट्रो धावेल, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. अंदाजे 910 कोटी रुपयांचा खर्च असून 4.13 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. पिंपरी ते निगडी मेट्रोमार्गासाठी दोन आठवड्यांपूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली होती.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)