Priyanka Chaturvedi Reacts On Burberry T-Shirt Trolls: आजच्या विधानसभा निवडणुकीच्या दिवशी शिवसेना यूबीटी खासदार प्रियांका चतुर्वेदी चर्चेत आल्या आहेत. प्रियांका चतुर्वेदी यांनी बुधवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले. यावेळी त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया खात्यावर त्यांच्या शाईच्या बोटाचा फोटो शेअर केला. मात्र या फोटोमध्ये त्यांनी जो टी-शर्ट घातला सध्या त्याची चर्चा सुरु आहे. अहवालानुसार, प्रियांका चतुर्वेदी यांनी बर्बेरी ब्रँडचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. त्यानंतर या पोशाखाबद्दल त्यांना ट्रोल करण्यात आले. नेटिझन्सनी त्यांच्यावर लक्झरी ब्रँडचे कपडे परिधान करून, धारावी झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध केल्याचा आरोप केला. आज मतदानासाठी त्यांनी घातलेला बर्बेरी टीशर्ट 30,000 रुपयांचा असल्याचा दावा काहींनी केला. एका वापरकर्त्याने त्यांना 'ब्रँड की दुकान’ असेही संबोधले. दुसऱ्या वापरकर्त्याने वेबसाइटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात टी-शर्टच्या महागड्या किमती दर्शविल्या आहेत.

त्यानंतर आता प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्रोल्सवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणतात, ‘आज माझ्या एका फोटोने भाजपच्या अनेक लोकांना त्यांचे 2 रुपयांचे ट्विट लक्ष्य पूर्ण करण्यास मदत केली आहे, मला खूप आनंद झाला आहे. मी वचन देते की, भविष्यात देखील मी तुमचे ट्रोलिंगचे दुकान बंद होऊ देणार नाही.' (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2024: पुण्यात ट्रान्सजेंडर गट 'शिखंडी ट्रस्ट'चा मतदानावर बहिष्कार, जाणून घ्या कारण)

Priyanka Chaturvedi Reacts On Burberry T-Shirt Trolls:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)