PM Narendra Modi आज (19 जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आज पंतप्रधान मोदी सोलापूर मध्ये विकासकामांचं भूमिपूजन, लोकार्पण करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ते PMAY योजनेअंतर्गत 90 हजार घरांच्या चाव्यांचं वितरण करतील सोबतच पीएम स्वनिधी योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं वितरण देखील करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाच्या हस्तांतर सोहळ्यासाठी कुंभारीच्या माळरानावर तयार झालेल्या रे नगर येथे आज येणार आहेत.
पहा ट्वीट
प्रधानमंत्री @narendramodi आज महाराष्ट्र दौऱ्यावर
सोलापूर इथं विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण #PMAY योजनेअंतर्गत ९० हजार घरांच्या चाव्यांचं वितरण
रे नगर गृहनिर्माण संकुलातल्या १५ हजार घरांचं लोकार्पण
पीएम स्वनिधी योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं वितरण pic.twitter.com/5ywd79LJs6
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) January 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)