भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची कोरोना विषाणू चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मुंडे यांनी स्वतः ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी, पंकजा मुंडे यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये कोविड-19 ची लागण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे सध्या मुंबईतील त्यांच्या घरी क्वारंटाईनमध्ये आहेत आणि त्यांच्यात सौम्य लक्षणे दिसली आहेत. महाराष्ट्रातील दहाहून अधिक मंत्री आणि किमान 20 आमदारांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.
Corona बाधीत लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे.. चाचणी केली...लक्षणं आणि Corona दोन्ही आहे... सर्वानी काळजी घ्यावी..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)