पुणे मुंबई महामार्गावर (Mumbai-Pune National Highway) आज पहाटेच्या सुमारास खंडाळा बोर घाटातील (borghat khandala) अंडा पॉईंट (Anda Point) अवघड वळणावर कंटेनर आणि पीकअँप या दोन वाहनांची टक्कर झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहे. घटनास्थळी खोपोलीतील अपघातग्रस्तांसाठीची असलेली मदतीची टीम आणि महामार्ग पोलीस दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्याचं काम सुरू त्यांनी केले. या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. सध्या वाहतुक सुरळीत सुरु आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)