सायन स्टेशन वरून वांद्रे आणि धारावीला जोडणारा पूल 20 जानेवारीपासून बंद होणार आहे. त्यामुळे या भागातील चालवल्या जाणार्या बेस्ट बसच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत. सायन मध्यवर्ती असल्याने नवी मुंबई आणि मुंबई मधून पश्चिम उपनगरामध्ये जाणार्यांना आता पर्यायी मार्गाने जाण्याचे सूचवले आहे. यात बेस्ट बसने देखील काही बससेवांमध्ये बदल केले आहेत. काही बस धारावी, माटुंगा मधून चालवल्या जाणार आहेत तर काहींना बीकेसी चुनाभट्टी कनेक्टरने जाता येणार आहे. Mumbai Traffic Update: सायन वरून धारावी- वांद्रे ला जोडणारा स्टेशन वरील पूल 20 जानेवारी पासून होणार बंद.
पहा ट्वीट
A complete official list of diversions of B.E.S.T buses following demolition of Sion road over bridge. #Mumbai pic.twitter.com/P18zbyPvpG
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) January 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)