महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड अशा बड्या नेत्यांनी आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. राज्यात कालपासून घडत असलेल्या घटना पाहता ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. आता माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, सरकार वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्याचा सल्ला शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. आता या सल्ल्याबाबत शिवसेना काय निर्णय घेईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शरद पवार का सुझाव उद्धव ठाकरे को,एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री बनाने की सलाह दी, तो क्या ढाई ढाई साल का फॉर्मूला काम करेगा? क्या उद्धव इस सुझाव को मानेंगे?
— Sayyed Aamir Husain (@nn_aamir) June 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)