केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज 66 वा वाढदिवस साजरा करत आहे. आरएसएस कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. परिवहन मंत्री म्हणून त्यांचा राज्यातला आणि केंद्रातला कामाचा धडाका यामुळे जनसामान्यांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर मधील त्यांच्या घरी कुटुंबियांनी त्यांचं औक्षण केले. यावेळी ताटात 66 दिवे ठेवत त्यांचं औक्षण करण्यात आले. यावेळी चिमुकल्या नातीनेही आजोबा नितीन गडकरी यांच्या औक्षण सोहळ्यात सहभाग घेतला होता.
पहा नितिन गडकरींच्या 66 व्या वाढदिवसांचं सेलिब्रेशन
#Birthday #Family pic.twitter.com/fF2k1PzNa0
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)