महाराष्ट्रातील नंदुरबार येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील तळोदा येथे एका आजारी महिलेचा तिच्या पतीच्या खांद्यावर मृत्यू झाला आहे. ही 60 वर्षीय महिलेला तिचा 65 वर्षांचा नवरा 22 किमी अंतरावर असलेल्या रुग्णालयात चालत घेऊन जात होता. नंदुरबारमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्ते खराब झाले आहेत. महिलेने वेदना वाढल्याची तक्रार केल्यानंतर पतीने तिला खांद्यावर घेतले आणि तळोदा ग्रामीण आरोग्य केंद्राच्या दिशेने चालायला सुरुवात केली. मात्र रस्त्यातच या महिलेचा मृत्यू झाला. पावसाचा इथल्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
Since the local sub-health centre is reportedly shut for over a year now, the undeterred husband, Aadlya Padvi, lunged her on his shoulders and started a tortuous downhill trek along the sludgy & slippery path to go to the Taloda rural hospital, some 22 km away from the village. pic.twitter.com/JS2cPGrrlK
— IANS Tweets (@ians_india) September 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)