कर्नाटक सरकारच्या मंत्र्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यांबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, कर्नाटक सरकारला इशाराही दिला. मुंबईवर हक्क सांगण्याचा प्रयत्न आणि महाराष्ट्राबद्दल केली जाणारी बेताल वक्तव्ये आम्ही खपवून घेणार नाही. केंद्रीय गृहमंत्र्याच्या भेटीत दोन्ही राज्यांनी घेतलेल्या भूमिकेविरुद्ध वक्तव्ये, दावे केल्याने दोन्ही राज्यांतील ( कर्नाटक-महाराष्ट्र) संबंध बिघडतील. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाला वेळीच सावधानतेबद्दल अवाहन केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर दोन्ही पक्ष (सरकारे) कोणताही दावा, वक्तव्ये करणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कर्नाटकसरकारमधील मंत्री आणि नेत्यांनी केलेले दावे, वक्तव्ये ही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीत ठरलेल्या भूमिकेच्या विरोधात असल्याचेही फडणवीस यांनी या वेळी म्हटले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)