गेल्या दोन आठवड्यांपासून कडक उन्हाचा सामना केल्यानंतर, आता मुंबईकरांना वाढत्या तपामानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शहरातील दिवसाचे तापमान सुमारे 4-5 अंश सेल्सिअसने घसरल्याने मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता माहिती मिळत आहे की, मुंबई आणि त्याच्या उपनगरांना पुढील काही दिवस आल्हाददायक रात्री आणि सकाळ अनुभवायला मिळेल. आजपासून पुढील आठवड्यातही सूर्यप्रकाश आणि स्वच्छ हवामानाचा ट्रेंड कायम राहील. 19 मार्च रोजी तापमान 25 ते 30.4 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. 22 मार्च पर्यंत तापमानात घट दिसून येईल. अशाप्रकारे येत्या काही दिवसांत उन्हाची काहिली कमी होणार असल्याने मुंबईमधील दिवसा आणि रात्री हवामान सुखद असेल. (हेही वाचा: Matheran Hill Station Closed: माथेरान हिल स्टेशन अनिश्चित काळासाठी बंद; पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी घेतला निर्णय)
🚨 Mumbai and its suburbs are set for a pleasant night and morning ahead. 📉
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) March 18, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)