मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीतील वेरावली सेवा जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून आता जलवाहिनीमध्ये पाणी सोडून सेवा जलाशय भरण्यात येतील नंतर टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल. दरम्यान मागील 50 तासांपासून हे काम सुरू असल्याने आजूबाजूच्या अनेक भागात पाणीपुरवठा आज न झाल्याने नागरिकांचा खोळंबा झाला आहे. Andheri's Gokhale Bridge Opening Date: मुंबई मध्ये 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत गोखले पुलाची एक मार्गिका खुली करणे शक्य - BMC ची माहिती .
पहा ट्वीट
🚰अंधेरीतील वेरावली सेवा जलाशयाच्या १८०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती ही वेगवेगळ्या आव्हानांवर मात करुन, सुमारे ५० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्ण झाली आहे.
💧आता या जलवाहिनीमध्ये पाणी सोडून सेवा जलाशय भरण्यात येतील. त्यानंतर सर्व संबंधित परिसरांमध्ये… pic.twitter.com/2JjhCarS2P
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)