मुंबईतील जेजे रुग्णालयातील त्वचारोग विभागातील 21 निवासी डॉक्टर गेल्या 11  दिवसांपासून सामूहिक रजेवर आहेत. विभागप्रमुख डॉ महेंद्र कुरा यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याने, जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या महाराष्ट्र संघटनेचे 900 हून अधिक डॉक्टरही गुरुवारपासून (28 डिसेंबर) संपावर गेले होते. त्यामुळे रुग्णालयाची यंत्रणा पूर्णतः कोलमडली होती. आता माहिती मिळत आहे की, महाराष्ट्र सरकारने गुरुवारी डॉ महेंद्र कुरा यांच्या बदलीचा आदेश जारी केला. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची बदली करण्यात आली आहे. या आदेशानंतर, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरच्या सुरुवातीस, मानसिक छळ आणि वैद्यकीय निष्काळजीपणामुळे सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी, त्वचाविज्ञान विभागातील निवासी डॉक्टरांनी डॉ कुरा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. (हेही वाचा: Corruption Cases in Maharashtra: महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 10 टक्के वाढ, पहा आकडेवारी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)