मुंबईतील दादर स्थानकात शुक्रवारी रात्री दादर-पुडुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. एकाच रुळावर दोन ट्रेन आल्याने हा अपघात झाला. गदग एक्स्प्रेसची पुद्दुचेरी एक्स्प्रेसला टक्कर झाली. ही माहिती देताना मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दादर टर्मिनस येथून ट्रेन पुद्दुचेरीसाठी रवाना झाल्यानंतर रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली आणि यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या लोकल आणि मेल सेवेवर परिणाम झाला होता. हा सेवा काही काळासाठी ठप्प झाल्या होत्या. आता माहिती मिळत आहे की, अप आणि डाउन धीम्या मार्गावरील वाहतूक (जी सुरक्षेच्या कारणास्तव निलंबित करण्यात आली होती) ती पुनर्संचयित करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)