तुम्ही जर मुंबईमध्ये प्रवास करत असाल किंवा प्रवासास निघत असाल तर तुम्हाला मुंबईतील रहदारीबद्दल माहिती असायला हवे. केवळ माहिती असून चालणार नाही. त्यासाठी तुमच्याकडे अद्ययावत माहिती असायला हवी. खास करुन पवई- जेव्हीएलआर रहदारी (Powai-JVLR Traffic) कशी आहे हे माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे. कारण सर्वाधिक रहदारी तिथेच दिसते. आज या ठिकाणी फारशी रहदारी नसलीतरी मुंबईतील इतर काही ठिकाणी ती दिसते

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशी योगायतन सिग्नल (मानखुर्द) येथून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. या ठिकाणी ट्रेलर अपघातामुळे वाहतूक काहीशी मंदावली होती. अर्थात ही सकाळची घटना असल्याने आता जवळपास तीन तास उलटून गेले आहेत. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत सुरु झालेली पाहायला मिळते. (हेही वाचा, E-Ticket Booking via UTS Mobile App: भारतीय रेल्वे यूटीएस मोबाइल ॲपद्वारे ई-तिकीट बुकिंग प्रक्रिया केली सुलभ; जिओफेन्सिंग निर्बंध हटवले, घ्या जाणून)

नेस्को आणि इस्माईल युसूफ कॉलेज दक्षिणेके जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. येथे सुरु असलेल्या भुयारी मार्गाच्या कामामुळे वाहतूकीवर परिणाम होतो आहे.

मिलिंद नगर दक्षिणकडे आणि उत्तरेकडे जाणारी वाहतूकसुद्धा संथ गतीने सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)