Team India's Mumbai Road Show: अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते. टीम इंडियाने ही स्पर्धा जिंकून 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. टीम इंडियाच्या विजयानंतर भारताचे सर्व चाहते आपल्या स्टार खेळाडूंची वाट पाहत आहेत. भारतीय खेळाडू आता 04 जुलै रोजी सकाळी 6 च्या सुमारास भारतात पोहोचतील. मुंबईच्या नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक निघणार आहे. आता मुंबई पोलिसांनी बुधवारी टीम इंडियाच्या रोड शोपूर्वी मरीन ड्राइव्हच्या आसपास वाहतूक निर्बंध जारी केले.

पोलिसांनी सांगितले की, भारतीय क्रिकेट संघाची 4 जुलै रोजी मरीन ड्राइव्ह येथे जल्लोषात मिरवणूक काढण्यात येणार आहे, यावेळी मरीन ड्राइव्हवर प्रचंड गर्दी जमण्याची अपेक्षा आहे. यावेळी कोस्टल रोडच्या दोन्ही सीमा वाहतुकीसाठी खुल्या असतील, मात्र कोस्टल रोडच्या आधी आणि नंतरची वाहतूक प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज/मेघदूत ब्रिजवरून वळवली जाईल. (हेही वाचा: Team Pakistan Fielding Video: येड्यांचा बाजार, खुळ्यांचा दरबार! पाकिस्तान टीमची गादीवर कॅच प्रॅक्टिस, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)