मुंबई आणि आजुबाजूच्या भागात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज बीएमसीने सकाळच्या पहिल्या सत्रातील शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान दुपारच्या सत्राच्या शाळा-कॉलेजच्या सुट्टी बद्दल नंतर पावसाचा अंदाज घेऊन माहिती दिली जाणार आहे. आयएमडी च्या अंदाजानुसार, आज मुंबई मध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसणार आहेत. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. Mumbai Heavy Rainfall: मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस, रेल्वे रुळावर पाणी साचले, जनजीवन विस्कळीत (Watch Video).
बीएमसी कडून शाळांना सुट्टी
Mumbai Schools Heavy rain : मुंबई परिसरातील पावसामुळे मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी#mumbairain #maharashtrarain #rainupdate #abpmajha pic.twitter.com/yuv8VUTIDs
— ABP माझा (@abpmajhatv) July 8, 2024
जोरदार पावसाचा अंदाज
हवामान खात्याने मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, ही विनंती.…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)