मुंबईमधील गोरेगावच्या दिंडोशी परिसरात शुक्रवारी दोन व्यक्तींनी एका बस चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे की, हे दोघे ड्रायव्हरला त्यांच्या वाहनाला घासून पुढे गेल्याबद्दल शिवीगाळ तसेच मारहाण करत आहेत. याला प्रत्युत्तर करताना चालक आपले म्हणणे ऐकून घेण्याची विनंती करत आहे, मात्र संतप्त लोक त्याचा अपमान करणे चालूच ठेवतात. ही घटना राज्य परिवहन बसमध्ये घडली की खासगी बसमध्ये हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (हेही वाचा: Brawl at Lalbaugcha Raja Video: मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळात स्वयंसेवक आणि भाविकांमध्ये भांडण; समोर आल्या हाणामारीच्या दोन घटना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)