महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. मात्र, मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही इथे अनिष्ट परिस्थिती निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी लालबागच्या राजाचे भक्त आणि स्वयंसेवक यांच्यात भांडणाच्या दोन घटना घडल्या. एका घटनेत एक महिला स्वयंसेवक महिला भक्ताला मारहाण करताना दिसत आहे. दुसऱ्या घटनेत पुरुष भक्त आणि गणपती मंडळाचे पदाधिकारी यांच्यात हाणामारी होत असल्याचे दिसत आहे. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (हेही वाचा: Lalbaugcha Raja Darshan Video: लालबागचा राजा गणपती दर्शनासाठी भक्तांच्या रांगा)
लालबागचा राजा मंडळामध्ये हाणामारी -
Lalbaugcha Raja Video: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी; कार्यकर्ते आणि भाविक आपापसांत भिडले#LalbaugchaRaja #MTShorts pic.twitter.com/97clJbpWu6
— Mumbai Tak (@mumbaitak) September 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)