Mumbai Rains: प्रादेशिक हवामान विभागाने आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि इतर भागांसाठी यलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार संध्याकाळपासून मुंबईसह परिसरात पावसाने हजेरी लावली. गुरुवारी मुंबई, ठाणे आणि लगतच्या परिसरात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने, मुंबईकरांच्या नवरात्रोत्सवात व्यत्यय आला. या पावसाचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. पुढील 3-4 तासांत मुंबईसह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे-मुलुंड, मुलुंड-कुर्ला-घाटकोपर, दादर, वरळी, अंधेरी-वांद्रे, वांद्रे-दादर, बीकेसी, बोरिवली-अंधेरी येथे मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

शहरातील पाऊस पाहता मुंबई पोलिसांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे, 'शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, वाहने सावकाश चालवा, आपत्कालीन परिस्थितीत #१०० / #११२ डायल करा.' यासह हवामान खात्याने शुक्रवार, 11 ऑक्टोबरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. (हेही वाचा: Asian Development Bank कडून महाराष्ट्रामध्ये Coastal and Riverbank Protection साठी $42 million चं कर्ज)

मुंबईत वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)