मुंबई मध्ये पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. अधून मधून जोरदार सरी बसरत आहेत त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. अंधेरी सबवे, सायन भागात पाणी साचल्याचं चित्र आहे. त्यामुळे पाण्यातून वाट काढत सकाळी अनेक चाकरमनी बाहेर पडले आहेत. मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी मुंबई लोकल सेवा देखील तिन्ही मार्गांवर सुरळीत सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबई मध्ये 70-100 मीमी पाऊस झाल्याची माहिती आयएमडी कडून देण्यात आली आहे. तरीही कामावर जाणार्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.
पहा ट्वीट
#WATCH | Maharashtra: Waterlogging in various parts of Mumbai due to rainfall.
(Visuals from King's Circle area) pic.twitter.com/hkagOL9UCU
— ANI (@ANI) July 14, 2023
CR Monsoon update at 8.30 hrs on 14.7.2023. pic.twitter.com/N7D71QNmZl
— Central Railway (@Central_Railway) July 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)