Mumbai Rain: मुंबईमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आजही शहराला पावसाने चांगलेच झोडपले. आता पुढील काही तासासाठी शहराला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. कामानिमित्त ऑफिसला जाणाऱ्या लोकांना याचा सर्वात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. म्हणूनच अत्यंत आवश्यक असेल तरच सर्वसामान्यांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आता मुंबई ट्राफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे शहरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

अहवालानुसार, पाणी साचल्याने सक्कर पंचायत चौक शिवडी वडाळा वाहतूकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. यासह पाणी साचल्याने दादर टी.टी, हिंदमाता जंक्शन वाहतूकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. गांधी मार्केटमध्ये पाणी साचल्याने उत्तरेकडे जाणाऱ्या किंग सर्कल फ्लायओव्हरवर वाहतूक संथ गतीने आहे. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा: Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात पुणे, सातारासह अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या पुढील काही दिवसांसाठी तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)