Maharashtra Weather Forecast: देशातील काही राज्यांना पावसाने दिलासा दिला असला तरी, महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढत असल्याचे दिसत आहे. कालपासून मुंबई उपनगरासह महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशात हवामान खात्याने पुढील चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उद्या महाराष्ट्रातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

इतर धुळे, दुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपुर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळ व हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात पुढील चारही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पहा तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणी.

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)