मुंबई शहरातील वरळी परिसरात एका 42 वर्षीय व्यक्तीस लाठ्या-काठ्या आणि दगडांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. राजन दास असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. झालेल्या जबर मारहाणीत राजन दास याचा मृत्यू झाला आहे. वरळी पोलिसांनी या प्रकरणात सचिन कवंदर, सदा कवंदर आणि भावेश साळवे या तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी पीडितासोबत असलेल्या पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याची पोलिसांनी पुष्टी केली आहे. सर्व आरोपींविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
ट्विट
Maharashtra | A 42-year-old man identified as Rajan Das was beaten to death using sticks and stones in Mumbai's Worli area. Three accused named Sachin Kavander, Sada Kavander and Bhavesh Salve were arrested by Worli police. It was found that accused had a personal enmity with…
— ANI (@ANI) May 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)