मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी मुंबई मेट्रोने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. मुंबई मेट्रोने वेळापत्रकात (Mumbai Metro Timetable) मोठे बदल केले असुन आता भल्या पहाटे पासून रात्री उशिरापर्यत मेट्रो मुंबईकरांच्या (Mumbai Metro) सेवेत असणार आहे. तरी नव्या वेळापत्रक (Timetable) आजपासून म्हणजेचं २८ नोव्हेंबर पासून लागू करण्यात आले आहे. आता मुंबई मेट्रोच्या वर्सोवा (Versova Metro Station) आणि घाटकोपर मेट्रोस्थानकावरुन (Ghatkopar Metro Station) सुटणारी पहिली मेट्रो पहिली मेट्रो पहाटे ५.३० वाजता सुटेल. तर वर्सोव्यावरुन शेवटची मेट्रो रात्री ११ वाजून २० मिनिटांनी आणि घाटकोपरहून ११.४५ ला सुटेल. या संबंधित सविस्तर माहिती मुंबई मेट्रोकडून जारी करण्यात आली आहे.
#MumbaiMetroOne extends train operations from Monday, 28th November 2022. The first train will depart at 05:30 am from both Versova and Ghatkopar. The last train from Versova will depart at 11:20 pm and from Ghatkopar at 11:45 pm. #HaveANiceDay
— Mumbai Metro (@mumbaimetro01) November 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)