मुंबई उपनगरी विभागात अधिक प्रवाशांना सामावून घेणे, तसेच शहरात रेल्वे सेवा वाढवण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, पश्चिम रेल्वेने 49 लोकल ट्रेन सेवा 12-कार कॉन्फिगरेशनवरून 15-कार कॉन्फिगरेशनमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 15 ऑगस्ट 2023 पासून लागू होईल. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, तब्बल 49 लोकल ट्रेन सेवा 15-कार कॉन्फिगरेशनमध्ये वाढवल्याने प्रवाशांना नक्कीच याचा फायदा होईल. यामुळे प्रत्येक ट्रेनची वहन क्षमता 25% वाढेल. या बदलामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागात एकूण 15-कार सेवांची संख्या 150 वरून 199 वर येईल. (हेही वाचा: मुंबई म्हाडा लॉटरीचे निकाल जाहीर; पहा 4082 घरांसाठी भाग्यवान विजेत्यांची यादी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)