६ डिसेंबर म्हणजेच महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) साजरा करण्यासाठी देशभरातून भीम अनुयायी मुंबईतील चैत्यभुमिवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना (Dr. Babasaheb Ambedkar) नमन करण्यास हजेरी लावतात. याचं पार्श्वभुमिवर रेल्वे प्रशासनाकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिन अवघ्या एका दिवसावर येवून ठेपल्याने भिमभक्तांची  मुंबईत (Mumbai) गर्दी झाली आहे. तरी प्रवांशाना सार्वजनिक वाहतुकीत (Public Transport) कुठलीही अडचण येवू नये या पार्श्वभुमिवर मुंबई लोकलच्या (Mumbai Local) मध्य (Central Railway), हार्बर (Harbour Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) अशा तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक आज रद्द करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)