Mumbai Rains Update: मुंबई मध्ये काल रात्री बरसलेल्या धुव्वाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. पण नंतर जसा पावसाचा जोर ओरसला तशी स्थिती पुन्हा नियंत्रणात आली. रस्ते आणि रेल्वे ट्रॅक वरील पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आली आहे. IMD ने आज सकाळपर्यंत रेड अलर्ट दिला असला तरीही आता पाऊस बसल्याने पुन्हा रस्ते मोकळे झालेत तसेच रेल्वे देखील धावत असल्याने चाकरमनी पुन्हा कामाला लागले आहेत. मध्य रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक बिघडल्याने लोकल 3-4 मिनिटं उशिराने धावत आहे. नक्की वाचा: Mumbai Weather Updates: मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; हवामान अंदाज पाहता 5 ऑक्टोबर पर्यंत मुंबईतून पाऊस माघारी फिरणार .

पहा मुंबई मधील चित्र

बस सेवा सुरू

लोकल सेवा तिन्ही मार्गावर सुरू

कुर्ला स्थानकातील चित्र

रस्ते वाहतूकीसाठी खुले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)