मुंबई मध्ये काल पावसाने धुमाकूळ झाल्यानंतर आज थोडी विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या भागातून पावसाने उसंत घेतली आहे. आज पालघर वगळता मुंबई आणि आजुबाजूच्या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर मध्ये पावसाचा प्रभाव पाहता तेथे रेड अलर्ट कायम आहे. आता हळूहळू पावसाचा प्रभाव कमी होऊन हा अलर्ट ग्रीन आणि यलो होईल असेही आयएमडी ने स्पष्ट केले आहे. मुंबई मधून पाऊस दरवर्षी प्रमाणे 5 ऑक्टोबरच्या आसपास माघार घेईल तर महाराष्ट्रातून 10 ऑक्टोबरच्या आसपास पूर्ण माघार घेतली जाईल असे IMD Director Sunil Kamble यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
पहा आयएमडीचा हवामान अंदाज काय सांगतो?
#WATCH | Mumbai | IMD Director Sunil Kamble says, "Till yesterday afternoon orange alert was issued for Mumbai. But with the monsoon intensifying we issued a red alert till 8:30 am this morning. As soon as we issued a red alert we saw that more than 200 mm of rain was registered… pic.twitter.com/mtczwlLxW6
— ANI (@ANI) September 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)