मुंबई मध्ये रात्री 6 तासांत 300 मिली पेक्षा जास्त पाऊस बरसल्यानंतर आज सकाळी जनजीवन विस्कळीत झालेले आहे. दरम्यान आज दिवसभर देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशामध्ये अनर्थ टाळण्यासाठी समुद्रकिनार्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आज दुपारी भरतीची वेळ 1.57 ची असून लाटा 4.40 मीटर उसळण्याची शक्यता आहे तर ओहोटी रात्री 8.03 ची असून लाटा 1.64 मीटर उसळण्याची शक्यता आहे. Mumbai Traffic Update: मुंबई मध्ये Western Express Highway वर रस्ते वाहतूक संथ गतीने; Andheri Subway पाण्याखाली .
जाणून घ्या मुंबई मधील भरती ओहोटीच्या वेळा
🗓️ ०८ जुलै २०२४
⛈️☔मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहून अधूनमधून मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे
🌊 भरती - दुपारी - ०१:५७ वाजता - ४.४० मीटर
ओहोटी - रात्री - ०८:०३ वाजता - १.६४ मीटर
🌊 भरती -(उद्या - दि.०९.०७.२०२४) मध्यरात्री -…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)